सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश
क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चालू शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या .या स्पर्धेत श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडे च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले .
या स्पर्धेत वैयक्तिक स्पर्धेत 14 वर्षा खालील मुलगे /मुली १ ) अभीर प्रसाद पेडणेकर( लांब उडी )- प्रथम क्रमांक
२)प्रेक्षा उदय दळवी(लांब उडी)- तृतीय क्रमांक, ३ )सौम्या दत्ताराम मेस्त्री 600 मीटर धावणे- द्वितीय क्रमांक ४ ) समृद्धी संतोष नाईक 400 मीटर धावणे- द्वितीय क्रमांक ५ )समृद्धी अर्जुन आचरेकर 400 मीटर धावणे- तृतीय क्रमांक, ६ )अभीर प्रसाद पेडणेकर १०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक .
17 वर्षाखालील मुलगे /मुली १ )पूजा तुकाराम सावंत- 100 मीटर धावणे- प्रथम क्रमांक,२ ) धनश्री प्रभाकर कुंभार- तृतीय क्रमांक, श्रावणी दळवी 400 मीटरधावणे- द्वितीय क्रमांक ,साक्षी पेडणेकर 800 मीटर धावणे-द्वितीय क्रमांक, आरुषी सावंत 3000 मीटर धावणे – द्वितीय क्रमांक, कोमल नाईक 1500 मीटर धावणे- तृतीय क्रमांक ,गुरुनाथ मांजरेकर 1500 मीटर धावणे -तृतीय क्रमांक
सांघिक खेळ प्रकारात 14 वर्षे खालील मुली रिले 4100 मीटर- प्रथम क्रमांक, यामध्ये प्रीती पेडणेकर, लावण्या कुंभार, समृद्धी नाईक, स्वरा जोशी, हर्षा लोके, या खेळाडूंचा सहभाग होता. मुलगे रिले 4100 मीटर- प्रथम क्रमांक,यामध्ये अभीर पेडणेकर, विपुल पेडणेकर ,ज्ञानेश गावडे, निखिल सोनवणे, मंथन जाधव या खेळाडूंचा सहभाग होता . 17 वर्षाखालील मुली रिले 4 100 मीटर-प्रथम क्रमांक, यामध्ये तन्मयी पावनोजी ,पूजा सावंत ,रंजना परब, विभावरी मांजरेकर, सुरेखा केरकर या खेळाडूंचा सहभाग होता. 17 वर्षाखालील मुलगे रिले 4100 मीटर- द्वितीय क्रमांक यामध्ये आयुष नाईक ,आर्यन नागडे, गौरेश परब, विघ्नेश शिरोडकर ,विराज गावडे या खेळाडूंचा सहभाग होता. 17 वर्षे मुलगे कबड्डी – द्वितीय क्रमांक ,खो खो मुली- तृतीय क्रमांक. वरील पैकी सांघिक प्रथम क्रमांक व वैयक्तिक प्रथम व द्वितीय क्रमांकाची निवड जिल्हा स्तरासाठी झालेली आहे. .प्रशालेने दरवर्षीप्रमाणे परंपरा राखत समाधान कारक यश मिळवल्याने शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे सर्व पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई ,पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर, क्रीडा शिक्षक विजय सोनवणे, प्रवीण गोडकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक संघ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







