संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड
भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
सावंतवाडी, दिनांक ०६ मे:
भारतीय जनता पक्ष सावंतवाडी सरचिटणीस पदी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. संतोष तळवणेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शहर भाजप वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या शुभहस्ते श्री. तळवणेकर यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संतोष तळवणेकर यांनी आजवर संघटनात्मक कार्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच सक्रियतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्ती सोहळ्याप्रसंगी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरचिटणीस संतोष तळवणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी ही त्यांची नियुक्ती होते जाहीर केली यावेळी नगरसेवक प्रतीक बांदेकर,मोहिनी मडगावकर, अन्य नगरसेवक नगरसेवक सुनीता पेडणे, सुकज्ञा टोपले सिध्दांत भांबूरे ,साक्षी गवस, राघु चितारी ,मेघना साळगांवकर अन्य मान्यवर उपस्थित होते.








