
कणकवलीत आज महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी ‘महायुती’ने कंबर कसली आहे.
प्रचाराचा धडाका उडवून देण्यासाठी आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
सभेचा तपशील:
सभेचा तपशील:
- प्रमुख वक्ते: देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
- वेळ: दुपारी ठीक ३.०० वाजता
- स्थळ: उपजिल्हा रुग्णालयासमोर, कणकवली
महायुतीचे शक्तीप्रदर्शन
या सभेला महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत निर्णायक मानली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी कोणती नवी घोषणा करणार किंवा विरोधकांवर कशाप्रकारे तोफ डागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“चलो कणकवली!” – विकासाच्या मुद्द्यावर आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.








