तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात बंडखोरीचे निशाण; भाजपच्या गोटात खळबळ
तळवडे:
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत तळवडे मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे., अधिकृत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादातून अखेर बंडखोरी झाली आहे. भाजपचे संदिप गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर याचं जिल्हा परिषद मतदार संघातून कट्टर राणे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते प्रमोद गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामूळे मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तळवडे मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती.
- .
- मळगाव पंचायत समिती: या जागेसाठी राजेंद्र परब यांनी शड्डू ठोकल्याने पेच अधिकच वाढला आहे.
एकाच पक्षातून एकापेक्षा जास्त प्रबळ दावेदार समोर आल्याने मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नाराज कार्यकर्त्यांची भूमिका ठरणार कळीची
या बंडखोरीमुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. “एकीकडे पक्षाची ताकद असताना, दुसरीकडे अंतर्गत वादांमुळे निवडणुकीचे गणित बिघडण्याची भीती” काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ही बंडखोरी शमवण्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यश येते की ही ‘डोकेदुखी’ निवडणुकीच्या निकालापर्यंत कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







