
तळवडेच्या कन्येची राष्ट्रीय स्तरावर झेप!
बेंगलोर येथे झालेल्या कराटे स्पर्धेत सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदक
सावंतवाडी /तळवडे
सावंतवाडी शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ च्या कुं आर्या आनंद मोर्येला रौप्य पदक मिळाले आहे तीचे वडील श्री जनता विद्यालय या ठिकाणी येथील लिपिक श्री. आनंद मोर्ये कार्यरत आहेत. कन्या कु. आर्या मोर्ये हिने बेंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या या यशामुळे सावंतवाडी तालुक्यात तसेच तळवडे गावात तसेच सर्व
आर्याने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर हे महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. कराटेच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकून तिने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर श्री जनता विद्यालय आणि तळवदे गावाचे नाव उज्वल केले आहे.
तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे.
शाळेकडून विशेष गौरव!
कु. आर्या मोर्ये ही श्री जनता विद्यालयाच्या लिपिक श्री. आनंद मोर्ये यांची कन्या असल्यामुळे, गावाला हा विशेष अभिमानाचा क्षण आहे. तिच्या या यशाबद्दलसावंतवाडी शाळा क्रमांक ४चे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि सर्व कर्मचारी यांच्यातर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
शिक्षक पालक संघ मार्फत विशेष अभिनंदन केले आहे तिला कराटे प्रशिक्षक दिलीप राऊळ याचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापकांनी आर्याच्या जिद्द आणि मेहनतीचे कौतुक केले असून, तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आर्याच्या या यशातून परिसरातील इतर खेळाडूंना प्रेरणा मिळणार असून, तळवडेच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा उत्साह संचारला आहे.







