ठळक घडामोडी

होडवडे या ठिकाणीं भरले रानभाज्यांचे प्रदर्नश 30 हून अधिक भाज्यांचा समावेश

होडवडे या ठिकाणीं भरले रानभाज्यांचे प्रदर्नश 30 हून अधिक भाज्यांचा समावेश

होडावडे

होडावडे,ता.वेंगुर्ले,जि.सिंधुदुर्ग. येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे तर्फे ग्रामीन उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी व डाॅ. महेश शेडगे यांच्या मार्गदर्शनातून रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा ग्रामपंचायत हॅाल येथे आयोजित केल्या गेल्या होत्या.

त्यामध्ये स्थानिक पातळीवर आढळणाऱ्या 30 होऊन अधिक रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता, रानभाजी सोबतच त्यापासून कोणकोणते पदार्थ बनतात ती कुठे आढळते तिचं स्थानिक नाव त्याच्यातील औषधी गुणधर्म इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला होता, तसेच त्या रानभाजी पासून वेगवेगळ्या पाककला बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये 15 महिलांनी सहभाग घेतला होता.

कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून कु. करिष्मा मोहिते शैक्षणिक प्रकल्प अधिकारी लाभल्या होत्या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निशा ज्ञानेश्वर सावंत (पेवग्याची वडी ) दुसरा क्रमांक पार्वती शिरगावकर (गुळवेल वडी) आणि तृतीय क्रमांक नंदिनी कामत (तेरीच फदफद) यांनी पटकावला आणि बक्षीसासाठी मानकरी ठरल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच मा.श्री. राजबा सावंत ,ग्राम महसूल अधिकारी श्रीमती नेत्रा सावंत , ग्रामविकास अधिकारी मा.श्री. विकास केळुस्कर, माजी सरपंच श्रीमती कुंदा पै. , इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच .श्री.समीर परब, .श्री.रायरेश्वर पै, .श्री.मंगेश माणगावकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या रानभाजी प्रदर्शनाचा होडावडे गावातील सर्व गावकऱ्यांनी लाभ घेतला. तसेच सर्व मान्यवरांनी कृषीसखी कु.श्रेया निंबाळकर,कु. प्रणाली गिम्हवनेकर कु. स्नेहल फडतरे,कु. सिद्धी दिवेकर, कु. प्राजक्ता चिंचकर कु. नेहा मोरे कु. कृष्णाली पोळ यांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आणि असेच उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.