सावंतवाडी
हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन, आणि संस्कृती संवर्धनासाठी सकल हिंदू समाज आंबोली, चौकुळ व गेळे या तीनही गावांचे मिळून आंबोली येथे भव्य स्वरूपाचे हिंदू संमेलन आयोजित केलेले आहे .
हे संमेलन कोणताही पक्ष,संघटना किंवा व्यक्ती आयोजित करत असुन सकल हिंदू समाज मिळून करत आहे सर्व व्यक्ती आपला पक्ष, संघटना,पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून केवळ एक हिंदू म्हणून एकत्र येणार आहेत.
श्रीराम मंदिर आंबोली ते श्री देवी माऊली मंदिर आंबोली अशा भव्य शोभा यात्रेचे आयोजन सायंकाळी चार ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे . या शोभायात्रेत ढोल पथकासह भगवा ध्वज, प्रभू श्री रामचंद्रांचा रथ, छत्रपती शिवरायांची प्रतिमा, भारत माता असे रथ असतील. शोभायात्रेत लहान थोर सर्व हिंदू बंधू आणि भगिनी पारंपारिक वेशात सहकुटुंब सहभागी होणार आहेत .
या शोभा यात्रेसाठी जमण्याचे ठिकाण श्रीराम मंदिर बाजारवाडी आंबोली असून सर्वांना ३.३० वा उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे .
शोभायात्रेचा समारोप श्रीदेवी माऊली मंदिर आंबोली या ठिकाणी होईल यावेळी सायंकाळी सहा वाजता भव्य संमेलन असेल . प्रमुख वक्ते म्हणून ज्वलंत हिंदुत्ववादी विचारसरणीचे भोसरी विधानसभेचे आमदार श्री महेश दादा लांडगे उपस्थित राहणार आहेत. तर डॉ पंकजजी दिघे,मालवण यांचे हिंदू धर्म, संस्कृती संवर्धन व पंच परिवर्तन या विषयावर व्याख्यान होईल . याच संमेलनात आंबोली गावची सुकन्या ह भ प सायली ताई महाराज गावडे यांचेही व्याख्यान आयोजित केले आहे .
संमेलनानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे .
या माध्यमातून आंबोली,गेळे चौकूळ तसेच पंचक्रोशीतील सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. हिंदू धर्म,संस्कृती संवर्धन व संघटन यासाठी आयोजित या भव्य सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन हिंदू समिती आंबोली चौकुळ गेळे यांच्या वतीने करण्यात येत आहे .






