ठळक घडामोडी

ॲक्शन मोड! निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आमदार दीपक केसरकर स्वतः मैदानात!थेट बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी साधला संवाद


सावंतवाडी.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी जोरदार दौरा करत मैदान गाजवले. त्यानंतर, निवडणुकीच्या अगदी पूर्वसंध्येलाच सायंकाळी आमदार दीपक केसरकर हे स्वतः पुन्हा एकदा सक्रियपणे प्रचारात उतरले आहेत. त्यांनी थेट बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
आजारपणामुळे घेतला होता ‘सभां’वर भर
आमदार केसरकर हे गेले काही दिवस आजारी असल्यामुळे थेट ‘रोड शो’ किंवा घरोघरी प्रचारात उतरले नव्हते. त्यांनी जाहीर सभा करण्यावर आणि दूर राहून प्रचारावर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला होता.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीत सकाळी जोरदार प्रचार केल्यानंतर. त्यांनी अखेर स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि शहरातील मुख्य बाजारपेठ गाठली. या दौऱ्यात त्यांनी लहान-मोठ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.
निवडणुकीला काही तास उरले असताना केसरकरांनी थेट व्यापाऱ्यांशी संपर्क साधल्याने, भाजपने आता अंतिम टप्प्यात प्रचारात आणखी वेग पकडल्याचे दिसत आहे.