महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर 80389 भरघोस मतांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मधुन निवडून आल्यावर महायुतीच्या कार्यकर्ते यांनी त्यांची सावंतवाडी शहरातून भव्य मिरवणुक काढली. यावेळी शहारातील ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठया प्रमाणात कार्यकर्ते यावेळी मिरवणुकीला उपस्थित होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मध्ये दिपक केसरकर यांनी चौकार मारला आहे.








