ठळक घडामोडी

अहोरात्र जनसेवेत तत्पर असणारे धडाडीचे शिवसेना जिल्हाप्रमुख नेते संजू परब यांचा आज वाढदिवस!

अहोरात्र जनसेवेत तत्पर असणारे धडाडीचे नेते संजू परब यांचा आज वाढदिवस!

सावंतवाडी: (रामचंद्र कुडाळकर)
राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे, रोखठोक भूमिका, बिंधास्त स्वभाव आणि दिलदार मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांची खास ओळख आहे, ते शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मा. श्री. सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा आज वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा होत आहे.
सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात क्षणाचाही विलंब न लावता धावून जाणारा आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे खडक बनून उभा राहणारा लोकनेता म्हणून संजू परब यांनी स्वकर्तृत्वाने जिल्ह्यात एक वेगळे वलय निर्माण केले आहे.

संघर्षमय राजकीय प्रवास आणि भक्कम नेतृत्व

खासदार नारायण राणेनिलेश राणे यांचे खंदे समर्थक आणि आमदार दीपक केसरकर (दीपक भाई) यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते अशी राजकीय वर्तुळात त्यांची एक भक्कम ओळख आहे.
शाखाप्रमुख पदापासून आपल्या कामाची सुरुवात करून युवक काँग्रेस, स्वाभिमान पक्ष तालुकाध्यक्ष, जिल्हाचिटणीस आणि आता शिवसेना जिल्हाप्रमुख असा त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय व यशस्वी राहिला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक आंदोलने छेडून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला.

विकासकामांचा धडाका व आपत्तीतील मदत

सावंतवाडी नगरपरिषदेच्या कालावधीत, विशेषतः कोरोनासारख्या अत्यंत कठीण आणि भयानक संकटाच्या काळात, त्यांनी शहराचा विकास कधीही थांबू दिला नाही. स्वतः जिवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली. आपल्या कुशल व आक्रमक संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले.

“आमच्या संजूला आमदार करायचे हाय!” — कार्यकर्त्यांची इच्छा

“आमच्या संजूला आमदार करायचे हाय!”
संजू परब यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले काम अफाट आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या या धडाडीच्या युवा नेत्याला आता महाराष्ट्राच्या विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून पाहायचे आहे, अशी तीव्र इच्छा सावंतवाडी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

आजच्या या विशेष दिनानिमित्त सावंतवाडी शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच हजारो कार्यकर्त्यांकडून मा. श्री. संजू परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
जनसेवेचा वारसा असाच अविरत पुढे नेणाऱ्या या कार्यसम्राट युवा नेत्याला उदंड, दीर्घायुषी आणि निरोगी जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!