माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून विक्रांत सावंत विजयी
पंचायत समिती मधून अपक्ष जितू गावकर विजयी तर भाजपच्या उत्कर्षा गावकर विजयी
सावंतवाडी
माजगाव जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे युवा नेते तसेच माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत सावंत यांनी अपेक्षे प्रमाणे विजय संपादन केला तर त्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे दिनेश सावंत यांना पराभव सहन करावा लागला. तर मळगाव पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार जितू गावकर हे विजयी झाले तर चराठे मतदार संघातून भाजपच्या उत्कर्षा गावकर यांनी विजयी झाले.







