ठळक घडामोडी

भोंदू बाबाच्या आहारी गेलेले लोकप्रतिनिधी राज्याचे काय हित साधणार? रुपेश राऊळ यांचा मंत्री दीपक केसरकरांवर घणाघाती हल्ला!



सावंतवाडी | प्रतिनिधी “

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, मात्र येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबांनी महिलांवर अत्याचार करून धुमाकूळ घातला आहे. हे लोकशाहीसाठी घातक आणि अत्यंत शरमेची बाब आहे. जे लोकप्रतिनिधी स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांच्या सल्ल्याने चालवतात, ते महाराष्ट्राचा काय विकास करणार?” असा जळजळीत सवाल ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊळ यांनी माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी चंद्रकांत कासार आणि रमेश गावकर उपस्थित होते.


केसरकरांमुळे सिंधुदुर्गाच्या नावलौकिकाला तडा रुपेश राऊळ यांनी टीकेची झोड उठवत म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र केसरकर यांच्या कृतीमुळे या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम झाले आहे. जनतेने त्यांना विकासासाठी निवडून दिले होते, मात्र मतदारसंघात उद्योग-व्यवसाय आणण्याऐवजी केसरकर भोंदू बाबाकडे स्वतःचे आरोग्य तपासण्याला आणि स्वतःचा विकास करून घेण्याला प्राधान्य देत आहेत. केसरकर हे त्या भोंदू बाबाचे ‘भक्त’ आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

केसरकर यांनी केवळ राजकीय स्वार्थ जोपासला असून सावंतवाडीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. जर त्यांना थोडी जरी नैतिक जबाबदारी वाटत असेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” — रुपेश राऊळ, विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

सखोल चौकशीची मागणी आणि आंदोलनाचा इशारा या संपूर्ण प्रकरणाची आणि दीपक केसरकर यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे. यासंदर्भात महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत: