ठळक घडामोडी

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

सावंतवाडी

श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन शिखर कलश सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी सकाळपासून विवध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर धार्मिक वेळेनुसार शिखर कलश स्थापन सोहळा थाटात संपन्न झाला. पुरोहित गावचे देवस्थनाचे मानकरी, सहमनाकरी ,तळवडे ग्रामस्थ, भक्तगण यांच्या उपस्थित हा मगलमय सोहळा संपन्न झाला.

तळवडे गावचे श्रीदेवी सातेरी देवीचा कलशारोहण सोहळा व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा गेले तीन दिवस सुरु आहे ,आज २४ एप्रिल 2025 रोजी मोठ्या दिमाखात चालू आहे या विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे .उद्या या सोहळ्याची श्री देवी सातेरी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा होऊन यांची समाप्ती होणार आहे. आज दुपारी कलशारोहणाचा महत्त्वाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला यावेळी तरंगकाठीसह अवसारी देवताच्या आशिर्वाद ने हा सोहळा संपन्न झाला यावेळी मोठया प्रमाणात भक्तगण यावेळी उपस्थित होते.