विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाला खतपाणी घालताना दिसत आहे
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पत्रकार परिषदेत ठाम व्यक्त केल मत

सावंतवाडी
कोणीही कितीही मागणी केली तरी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे शिवसेना यालाच मिळणारं आहे. आज जरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीने कितीही दावा केला तरी सावंतवाडी मतदारसंघ हा ठाकरे शिवसेनेला मिळणार आहे. कारण विद्यमान आमदार सूत्रानुसार या ठिकाणी महाविकास आघाडीला ही जागा सुटणार, अस ठाम मत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सावंतवाडी या ठिकाणी पत्रकार परिषदेत मत मांडल.
पंधरा वर्षे आमदारकी भोगणाऱ्या दीपक केसरकर यांनी आता आपली राजकीय निवृत्ती घ्यावी असे ते म्हणाले. पर्णकुटी विश्रामगृह पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. आज जिल्ह्यात पुन्हा दहशतवाद डोकं वर काढत आहे. याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. विद्यमान मंत्री दीपक केसरकर हे सध्या दहशतवादाला पाठराखण करताना दिसत आहे. निवडणुका जवळ आल्या की दहशतवाद पैशाचा वापर केला जातो मात्र यावेळी येथील जनता त्यांना योग्य धडा शिकवणार आहे. जिल्हा परिषद मध्ये टेंडर भरतेवेळी बाउन्सर चा वापर करून एक प्रकारे ठेकेदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आमदार वैभव नाईक यांनी याला वेळीच आळा घातला.
यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,मायकल डीसोझा,बाळा गावडे,शब्बीर मणियार,आबा सावंत,कौस्तुभ गावडे,आदी उपस्थित होते.








