श्रावणानिमित्त श्री देव क्षेत्रपालेश्वर–सातेरी मंदिरात महारुद्राभिषेक सेवा अनुष्ठान, कीर्तन व सत्यनारायण महापूजेचे आयोजन
होडावडा | प्रतिनिधी
श्रावण महिन्यानिमित्त श्री देव क्षेत्रपालेश्वर–सातेरी मंदिर, होडावडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महारुद्राभिषेक सेवा अनुष्ठान, सुश्राव्य कीर्तन, ग्रामस्थांची भजने तसेच सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता ह.भ.प. श्री. सदाशिव पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. हार्मोनियमवर श्री. गजानन मेस्त्री तर तबल्यावर श्री. अक्षय सरवणकर साथसंगत करणार आहेत. त्यानंतर रात्री ८.०० वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत.
त्यानंतर सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी मंदिरात सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. सायंकाळी ग्रामस्थांची भजनेही आयोजित करण्यात आली आहेत.
श्रावण महिन्यातील या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थानचे मानकरी, देवसेवक व ग्रामस्थ यांनी केले आहे.







