ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न !

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर,‌ प.पू.शरद जोशी महाराज, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कलशपूजन व कलशारोहण सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा गेले तीन दिवस हा सोहळा होत असून विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत आहे. आज सकाळी शतकलशार्चन, शतकलशाभिषेक, स्थापित देवतांवर अभिषेक आदी धार्मिक विधी संपन्न झाले. शकत कलशाभिषेकाचा मान १०० जोडप्यांना देण्यात आला. यानंतर दुपारी १२ वा. कलशारोहण करण्यात आले.

श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिराचे कलशारोहण श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर,‌ प.पू.शरद जोशी महाराज, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा सोहळा थाटात संपन्न झाला.

यावेळी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे,‌ सदस्य दीपक पटेकर, अमेय पै, जितेंद्र पंडित, बबलू तळवणेकर, लतिका सिंग, विनायक परडाकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत, विलास गोवेकर, संतोष तळवणेकर,श्री. विर्नोडकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सभापती आनंद नेवगी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर आदींसह दत्त भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.