ठळक घडामोडी

तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत असल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेना आपला खंबीर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत

तळवडे मतदारसंघात ‘बाहेरील व्यक्तीला उमेदवारी मिळत आल्याने निष्ठावंत माञ नाराज अंतर्गत नाराजीचा फटका निवडणूकीत बसण्याची तीव्र शक्यता

तळावडे (प्रतिनिधी):

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच तळावडे जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षात बंडखोरीची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली असून, पक्षातील ‘निष्ठावंत विरुद्ध आयात’ असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादला जाण्याच्या हालचालींमुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. तळवडे , मळगाव, नेमळे निरवडे असा तळवडे मतदार संघ येतो.

या भागात कार्यशील नेतृत्व असुन पणं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुर्ण मतदार संघाचा विचार केला तर फक्त तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात बाहेरील मतदार संघातील उमेदवार दिल्याने गेलीं अनेक कार्यशील असणाऱ्यांची मात्र निराशा झाली आहे.

स्थानिक नेतृत्वाची उपेक्षा, कार्यकर्त्यांचा संताप
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रंदिवस झटणारे स्थानिक कार्यकर्ते सध्या कमालीचे संतप्त झाले आहेत. तळावडे मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाकडे सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेले स्थानिक चेहरे उपलब्ध आहेत. असे असतानाही, वरिष्ठ पातळीवरून दुसऱ्या मतदारसंघातील उमेदवार पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
बाहेरचा उमेदवार नको, स्थानिकालाच संधी द्या,” अशी ठाम भूमिका घेत कार्यकर्त्यांनी आता ‘आरपार’ची लढाई छेडण्याचा निर्धार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपापसात गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली असून, पक्षाने निर्णय न बदलल्यास थेट बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी केली आहे.
“स्थानिक नेतृत्व डावलून बाहेरच्याला संधी दिली, तर आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडल्यास पक्षादेश झुगारून वेगळा विचार करू,” असा स्पष्ट इशारा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निष्ठावंतांची नाराजी दिसून येते आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना डावलल्याची भावनाव्यक्त होत आहे.


आगामी निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेला हा वाद भाजपचे वरिष्ठ नेते वेळीच शमवतात की कार्यकर्त्यांच्या रोषाकडे दुर्लक्ष करतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा हा आक्रमक पवित्रा निवडणुकीच्या निकालावर नेमका काय परिणाम करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तळवडे मतदार संघात अशी घटना घडल्याने मतदार मात्र कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आपला खबिर उमेदवार निवडणुक रिंगणात उतरत आहे त्यामूळे या तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.