ठळक घडामोडी

सावंतवाडी जि. प. शाळा क्र. ६ चा उदया ‘वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा’ दिमाखात संपन्न होणार

सावंतवाडी जि. प. शाळा क्र. ६ चा ‘वार्षिक स्नेहसंमेलन व ISO मानांकन सोहळा’ दिमाखात संपन्न होणार

सावंतवाडी:

येथील कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं. ६ चा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि ISO (9001:2015) मानांकन प्रदान सोहळा मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे.
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिपाली भालेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य व क्रीडा समिती सभापती माननीय श्री. सुधीरजी आडीवरेकर यांच्या हस्ते पार पडेल. यावेळी विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री. राजू भालेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यामध्ये:

  • श्रीम. सविता परब (गटशिक्षणाधिकारी, सावंतवाडी)
  • श्री. सहदेव चव्हाण (ISO समन्वयक, कोकण विभाग)
  • श्री. कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख, सावंतवाडी)
  • श्री. दिलीप भालेकर (शिक्षण तज्ज्ञ)
  • श्री. सतीश धुमाळे सर (मुख्याध्यापक, वि. स. खांडेकर हायस्कूल)
  • श्री. संतोष तळवणेकर (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग)
    कार्यक्रमाचे स्वरूप आणि सांस्कृतिक मेजवानी
    कार्यक्रमाची सुरुवात दुपारी २:३० वाजता ‘हळदीकुंकू’ समारंभाने होईल. त्यानंतर सायंकाळी ३:३० वाजल्यापासून मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल, ज्यामध्ये मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, अहवाल वाचन आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. याच वेळी शाळेला मिळालेल्या ISO (9001:2015) मानांकनाचे अधिकृत वितरण आणि विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन देखील पार पडणार आहे.
    मनोरंजनाच्या भागात सायंकाळी ५:०० वाजता मा. श्री. सगुण जाधव (मळेवाड) यांचा ‘संत गाडगेबाबा एकपात्री नाट्यप्रयोग’ सादर होईल. त्यानंतर ५:३० ते ७:०० या वेळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा ‘कलावैभव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल.
    या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. समीक्षा खोचरे, शालेय मुख्यमंत्री कु. स्वराज साळुंखे, उपमुख्यंमत्री कु. जिब्रा शेख, शिक्षक वृंद सौ. सायली लांबर आणि मुख्याध्यापक श्री. केशव जाधव यांनी केले आहे.