सावंतवाडीत १७ मार्चला ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य उद्घाटन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती
सावंतवाडी:
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित ‘कृषी महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मा. श्री. दिपकभाई केसरकर (आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ) आणि मा. डॉ. श्री निलेशजी राणे (आमदार, कुडाळ विधानसभा मतदारसंघ) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे) मा. श्री. शिवाजी आमले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, मा. श्री. डॉ. वैभव शिंदे (सहयोगी संशोधन संचालक, प्रा.फ.सं. केंद्र, वेंगुर्ला) आणि मा. श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग) यांचीही विशेष उपस्थिती या सोहळ्याला असणार आहे.
तसेच सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हा महोत्सव संपन्न होईल.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण कृषी प्रदर्शन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांची चर्चासत्रे हे असणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- प्रदर्शन व विक्री: विविध कृषी उत्पादने आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व थेट ग्राहक विक्री.
- शासकीय योजना: कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्वतंत्र दालन.
- तंत्रज्ञान: शेती अवजारे व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि ‘महाविस्तार AI’ नोंदणी सुविधा.
- शेतकरी सन्मान: प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे:
महोत्सवात विविध सत्रांमध्ये नामवंत मार्गदर्शक विविध विषयांवर प्रकाश टाकणार आहेत:
१. डॉ. वैभव शिंदे (संशोधन संचालक, वेंगुर्ला) – मसाला पीक व्यवस्थापन.
२. श्री. तानाजी सावंत (प्रगतशील शेतकरी) – शेतमाल विक्री व्यवस्थापन.
३. श्री. संदीप चोर्गे (अॅग्रीकार्ट) – स्थानिक वाण संवर्धन.
४. श्री. योगेश वालावलकर – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना.
५. डॉ. विनया बाड (आहारतज्ज्ञ) – पौष्टिक तृणधान्य व आहारातील महत्त्व.
६. डॉ. मृणाल सावंत (स्त्री रोग तज्ज्ञ) – स्त्रियांचे आरोग्य व आहार.
या महोत्सवात तृणधान्य, फळपिके आणि भाजीपाला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी श्री. अनिकेत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री. गोरखनाथ गोरे (तालुका कृषी अधिकारी, सावंतवाडी),श्री. मंगेश चव्हाण (तालुका कृषी अधिकारी, वेंगुर्ला),श्री. भास्कर चौगले (तालुका कृषी अधिकारी, कुडाळ),श्री. सौरभ कदम (तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग) व कृषी विभागाचे इतर अधिकारी/कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
हा महोत्सव सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार असून,सावंतवाडीत १७ मार्च रोजी ‘कृषी महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन; शेती तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाची पर्वणी
सावंतवाडी:
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी यांच्या वतीने मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सावंतवाडीत भव्य ‘कृषी महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मैदानावर सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत हा महोत्सव संपन्न होईल.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण कृषी प्रदर्शन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांची चर्चासत्रे हे असणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- प्रदर्शन व विक्री: विविध कृषी उत्पादने आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व थेट ग्राहक विक्री.
- शासकीय योजना: कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्वतंत्र दालन.
- तंत्रज्ञान: शेती अवजारे व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि ‘महाविस्तार AI’ नोंदणी सुविधा.
- शेतकरी सन्मान: प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे:
महोत्सवात विविध सत्रांमध्ये नामवंत मार्गदर्शक विविध विषयांवर प्रकाश टाकणार आहेत:
१. डॉ. वैभव शिंदे (संशोधन संचालक, वेंगुर्ला) – मसाला पीक व्यवस्थापन.
२. श्री. तानाजी सावंत (प्रगतशील शेतकरी) – शेतमाल विक्री व्यवस्थापन.
३. श्री. संदीप चोर्गे (अॅग्रीकार्ट) – स्थानिक वाण संवर्धन.
४. श्री. योगेश वालावलकर – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना.
५. डॉ. विनया बाड (आहारतज्ज्ञ) – पौष्टिक तृणधान्य व आहारातील महत्त्व.
६. डॉ. मृणाल सावंत (स्त्री रोग तज्ज्ञ) – स्त्रियांचे आरोग्य व आहार.
या महोत्सवात तृणधान्य, फळपिके आणि भाजीपाला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी उपविभागातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.