ठळक घडामोडी

सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन

सावंतवाडी :

शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघ यांच्या वतीने श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, प्रस्तुत पारंपरिक दशावतार नाटक ‘उघडले स्वर्गाचे दार’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता सर्वोदयनगर गार्डन, पाटणकर गॅस गोडाऊन जवळ, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
या नाट्यप्रयोगात दशावतार क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून श्री. केशव खांबल, कु. यश जळवी, श्री. अमित गवस, श्री. सचिन कोचरेकर, श्री. संतोष गावस, श्री. भगवान नाईक, श्री. विठ्ठल गांवकर, कु. साहिल राणे, श्री. नवनाथ गावस व श्री. सुखदेव राऊळ हे कलाकार विविध भूमिका साकार करणार आहेत.
सदर नाट्यप्रयोगाचे आयोजन सर्वोदयनगर रहिवाशी संघ, सावंतवाडी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. तरी सावंतवाडी परिसरातील आणि सर्वोदयनगर येथील रसिक प्रेक्षकांनी या पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रहिवाशी संघाचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, उपाध्यक्ष तथा प्रभागाचे नगरसेवक श्री. अजय गोंदावळे, सेक्रेटरी सौ. मेघना प्रकाश राऊळ यांनी केलं आहे.