
एखाद्या स्पर्धकांच्या कलेला चालना देणे हे अत्यंत मोलाचे- डॉ शेखर जैन निरवडे संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन
राजे प्रतिष्ठान व महासिंधुकिरण यांचे सामाजिक कार्य अतिशय मोलाचे – युवराज लखमराजे भोसले
द्वितीय क्रमांक स्वामी पेडणेकर इन्सुली ,तृतीय क्रमांक महेंद्र चव्हाण चौकुळ, तर उत्तेजनार्थ भरत पांडुरंग सावंत होडावडे,

सावंतवाडी:
एखाद्या स्पर्धकांच्या कलेला चालना देणे हे अत्यंत मोलाचे असते. महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठान या दोन संस्थांनी मोलाची कामगिरी केली आहे. गेली दोन वर्षे ‘मोस्ट व्हायरल गणराया’ ही गणेश सजावट स्पर्धा आयोजित करून या संस्थांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ शेखर जैन यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या भावी उपक्रमांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

महासिंधू किरण न्यूज चॅनेल आणि राजे प्रतिष्ठान कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोस्ट व्हायरल गणराया’ गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला.
राजे प्रतिष्ठान व महासिंधुकिरण यांचे सामाजिक कार्य अतिशय मोलाचे – युवराज लखमराजे भोसले
राजे प्रतिष्ठान व महासिंधुकिरण यांचे सामाजिक कार्य अतिशय मोलाचे आहे. या दोघांच्या माध्यमातून नेहमीच चांगले कार्य होत असते. राजे प्रतिष्ठान हे सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यशील असते,” अशा शब्दांत युवराज लखमराजे भोसले यांनी दोन्ही संस्थांच्या कार्याचा गौरव केला.
कोणत्याही उपक्रमात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असते आणि हेच कार्य महासिंधुकीरण व राजे प्रतिष्ठान यांनी यशस्वीपणे केले!!राजेश राऊत (ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार तथा उद्योजक)
“कोणत्याही उपक्रमात सातत्य ठेवणे महत्त्वाचे असते आणि हेच कार्य महासिंधुकीरण व राजे प्रतिष्ठान यांनी यशस्वीपणे केले आहे. त्यांनी कोकणाचा उत्सव कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी महासिंधुकीरण न्यूज चॅनेलचे विशेष कौतुक केले. जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा उत्साह डिजिटल माध्यमांतून घराघरांत पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य या चॅनेलने केले आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेत डिजिटल माध्यमातून सर्वाधिक व्हिवर्स (प्रेक्षक) मिळवून विजेते ठरलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यात प्रथम क्रमांकाचे मानकरी रवींद्र केळुसकर होडावडे, वेंगुर्ला यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ गौरविण्यात आले.द्वितीय क्रमांक स्वामी पेडणेकर इन्सुली सावंतवाडी ,रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.तृतीय क्रमांक महेंद्र चव्हाणचौकुळ, सावंतवाडी यांनी प्राप्त केले यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ भरत पांडुरंग सावंत होडावडे, वेंगुर्ला यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या दिमाखदार सोहळ्याला डॉ शेखर जैन (चेअरमन, संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे),युवराज लखमराजे भोसले (प्रमुख पाहुणे),राजेश राऊत (ज्येष्ठ रंगकर्मी, पत्रकार व उद्योजक),मोहिनी मडगावकर, (नगरसेविका, सावंतवाडी नगरपालिका),संतोष तळवणेकर (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठान),रामचंद्र कुडाळकर(संपादक,)महासिंधुकिण न्यूज चॅनेल),शिवा गावडे (जिल्हा प्रवक्ते, राजे प्रतिष्ठान),ज्ञानेश्वर पारधी (जिल्हा खजिनदार, राजे प्रतिष्ठान),अंकिता माळकर (महिला जिल्हाध्यक्ष)रमाकांत गावडे (जिल्हा कार्यकारणी सदस्य)संचिता गावडे (तालुका अध्यक्ष)तसेच संजय भाई (पत्रकार),विजया चव्हाण, सुनीता भाईप, अनिता मठकर, रूपाली रेडकर, निकिता परब, सुवर्णा गवस, अनिल सावंत, शरद सावंत, प्रणिता सावंत आणि बहुसंख्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. केशव जाधव सर,यांनी केले, तर प्रास्ताविक महासिंधुकीरण न्यूज चॅनेलचे संपादक रामचंद्र कुडाळकर यांनी मांडले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. रमाकांत गावडे सर यांनी मानले.







