ठळक घडामोडी

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला आवश्यक पाणी तिलारी योजनेतून देणार,टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार! शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर याची पत्रकार परिषदेत माहिती!

केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली माहिती.

कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव देणारं

सावंतवाडी

सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी या टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून उर्वरित निधी ही ते देणार आहेत. सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक पाण्याचा त्या ठिकाणी तुटवडा आहे. मळगाव येथे पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस साठी लागणारे पाणी तिलारी नळपाणी योजनेतून पुरविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आहे. तसेच सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रेलोटेलचा खर्च हा सिंधुरत्न योजनेतून करण्यात येणार असून महाराष्ट्र पर्यटन महामंडळाशी करार झाल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबत काही अडचणी आहेत. पण दक्षिणेला जाणाऱ्या काही गाड्या तसेच उत्तरेला जाणाऱ्या काही गाड्या वंदे भारत गाडी संदर्भात त्यांनी रेल्वे प्रशासनाला सूचना केल्या असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे तसेच कोकण रेल्वे प्रशासनाची आपण याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच काही रेल्वे गाड्या कुडाळ येथे थांबतात तर काही पेडणे येथे थांबतात. ज्या तिथे थांबत नाहीत त्या गाड्यांना सावंतवाडीत थांबा दिला जाईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री यांनी दिल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.रेल्वे प्रवाशी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनसला कै.मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली. पण मंत्री त्यांनी अशा प्रकारे कुठेच नाव दिले गेले नसल्याने नाव देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती ही मंत्री केसरकर यांनी दिली.कोकण रेल्वे महामंडळ असल्याने त्याला रेल्वेकडून म्हणावा तसा निधी मिळत नाही. त्यामुळे गोवा राज्याने ज्या प्रमाणे कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेमध्ये विलीन करा असा प्रस्ताव दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडूनही तसा प्रस्ताव दिला जावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.