ठळक घडामोडी

वृक्षारोपण उपक्रमाद्वारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण जोपासनाचा वसा

वृक्षारोपण उपक्रमाद्वारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण जोपासनाचा वसा….

निरवडे

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये वृक्षारोपण हा उपक्रम आज 28जून रोजी आयोजित करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर यांनी स्वतः वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

त्यानंतर प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यानी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षण कसे करता येईल याचे सुंदर उदाहरण प्रदर्शित केले. तसेच झाडे पर्यावरण संवर्धनासाठी किती महत्त्वाची असतात व यात आपली भूमिका काय आहे याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. अशाप्रकारे वृक्षारोपण हा कार्यक्रम संस्कार नॅशनल स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.