ठळक घडामोडी

सावंतवाडीच्या विकासासाठी कटिबद्ध; आमदार दीपक केसरकर यांनी घेतली नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची भेट!श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन



सावंतवाडी:


सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी श्रद्धाराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


‘आदर्श शहर’ घडवण्याचा निर्धार
सावंतवाडी शहराचा कायापालट करण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले. “आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवूया,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार केसरकर सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी राजवाड्यात जाऊन नगराध्यक्षांची भेट घेतली. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले देखील उपस्थित होते. आगामी काळात शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासकामांवर सकारात्मक चर्चा होईल, अशी अपेक्षा या भेटीनंतर व्यक्त केली जात आहे.