ठळक घडामोडी

तळवडे येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

तळवडे प्रतिनिधि

कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन संपन्न


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत तळवडेच्या मा.सरपंच श्रीमती वनिता मेस्त्री यांच्या शुभहस्ते करण्यात आले.डॉ रणजित देव्हारे (प्राध्यापक ,कॅस ),डॉ. गिरीश ऊईके ( साहाय्यक विस्तार विषेशतज्ञ),श्री एस.वी. राजेशिर्के (आरसीएफ मॅनेजर), प्रिया सावंत (कृषी साहाय्यक), बाबुराव परब (सोसायटी अध्यक्ष) श्यामसुंदर कुंभार (तंटामुक्ती अध्यक्ष)आणि स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी बंधू आणि भगिनीं यांचा सहभाग लाभला
कार्यक्रमात श्री एस. वी. राजेशिर्के यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.आणि श्री रणजित देव्हारे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व त्याचे फायदे सांगितले तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन केले.
माहिती केंद्रामध्ये फळे, भाजीपाल्याची विकसित केलेले वाण त्याचप्रमाणे त्यापासून बनवलेले पदार्थ, पिकांविषयी माहिती देणारे तक्ते, विद्यापीठाने विकसित केलेली अवजारे, आणि काही कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा.विजय दळवी
यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती केंद्राची निर्मिती करण्यात आली असून महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले
कृषिकन्या ईश्वरी राणे, वृषाली काळे,सियाली थोरात, मनस्वी खामकर,यज्ञश्री पाटील,आरोही सावे निकिता सोनटक्के यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन व मान्यवराचे आभार मानून केंद्राचीरूपरेषा सादर केली.