ठळक घडामोडी

होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी

होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर जत्रोत्सव ७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार संपन्न

वेंगुर्ला (प्रतिनिधी) –

दक्षिण कोकणातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि होडावडे गावचे जागृत ग्रामदैवत असणाऱ्या श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव येत्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. श्रद्धाळू भक्तांच्या नवसाला पावणारे हे दैवत असल्याने, या जत्रोत्सवाला केवळ परिसरातीलच नव्हे, तर असंख्य भक्तगण दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाला साकडे घालतात आणि नवस फेडतात.७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या वार्षिक जत्रोत्सवात विविध धार्मिक आणि रात्रौ नाईक दशावतार नाट्य मडळ मोचेमाड याचा नाट्यप्रयोग सादरीकरण होणार आहे. या भव्यदिव्य उत्सवाचा सहभाग होण्यासाठी आणि देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहेत.