वेंगुर्ला :
शिवसेना वेंगुर्ला तालुक्याचे नूतन तालुकाप्रमुख श्री. गुणाजी उर्फ बाळा दळवी यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान विभागप्रमुख मितेश परब, आबा केसरकर तसेच अर्चित पोकळे उपस्थित होते. नूतन तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर झालेल्या या भेटीत संघटनात्मक कामकाज, पक्षबांधणी आणि आगामी काळातील विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी गुणाजी उर्फ बाळा दळवी यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभावीपणे काम करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







