ठळक घडामोडी

गोविंद चित्र मंदिर नजीक धोकादायक सुकलेल झाड तोडल्याबद्दल नगरपरिषद व झाड मालकाचे मनःपूर्वक आभार – रवी जाधव सामजिक कार्यकर्ते

सावंतवाडी

गेले कित्येक वर्षापासून हे भले मोठे झाड सुटलेल्या अवस्थेत गोविंद चित्र मंदिर या रस्त्यावर होते व त्याच्या सुकलेल्या फांद्या पडून दोन वेळा अपघात देखील झाले होते. याबाबत रवी जाधव यांनी कित्येक वेळा निवेदन देऊन नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. आता अवघ्या काही दिवसातच जोरदार पाऊस सुरू होणार आहे जोपर्यंत पाऊस कमी आहे तोपर्यंत रस्त्यावरील कामे त्वरित करून घ्यावी जेणेकरून कुठच्याही प्रकारचा अपघात घडणार नाही याची दक्षता ठेकेदारी घ्यावी अशी विनंती रवी जाधव यांनी केली आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हायवे तसेच रस्त्यावरील सुकलेली धोकादायक झाडे किंवा त्याचे फांद्या तोडण्यासाठी नगरपरिषद यांच्याशी पत्रव्यवहार करून ती तोडून घेण्यास विनंती केली होती त्या अनुषंगाने नगर परिषदेने झाड मालकाला नोटीस काढली होती त्यानुसार धोकादायक झाडे तोडण्यात आली.
शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला अजून अशाच प्रकारची धोकादायक झाडे आहेत ती ही तत्काळ तोडून घ्यावी अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षापासून सावंतवाडी बाजारपेठ तसेच शहरांमधील आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील धोकादायक झाडे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते बबन डिसोजा यांच्या सहकार्याने तोडून घेतली होती तसेच शहरातील रस्त्यावरील 133 धोकादायक खड्डे देखील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वखर्चाने सिमेंट काँक्रेटने बुजवून शहरातील 64 गतिरोधकांवर पांढऱ्या पट्ट्या मारल्या होत्या त्यामुळे बराच अपघात टळले होते त्यावेळी बुजवल्या खड्ड्यांमुळे शहरातील काही ठिकाणाचे रस्ते अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था प्रत्येक नागरिकांची काळजी घेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे कोणालाही नुकसान होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान नेहमी सतर्क असते व त्या संदर्भातच्या सूचना वारंवार नगरपरिषदेला तथा बांधकाम विभागाला देत असते त्यानुसार ते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांनला सहकार्य करतात.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेच्या सेवेसाठी आम्ही सतर्क आहोत असे आवाहन केले आहे.