ठळक घडामोडी

सावंतवाडीच्या बदल्यात मंत्री दिपक केसरकर यांना मुंबईची उमेदवारी द्या! केसरकर फक्त घोषणामंत्री!! माजी आमदार राजन तेली

सावंतवाडी ठिकाणी पत्रकार परिषदेत केली केसरकर यांच्या वर जोरदार टीका

सावंतवाडी प्रतिनिधी

पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेत भाजपचा उमेदवार
सावंतवाडीतून द्यावा अशी मागणी करणार आहे. भाजप पक्ष इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल
तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार तथा मंत्री दिपक केसरकर आजवर जनतेची फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही.
याची खबरदारी महायुती घेईल असं विधान माजी आमदार
राजन तेली यांनी व्यक्त केले. तर, मंत्री दिपक केसरकर मुंबईचे
पालकमंत्री आहेत. त्यांना तिथेच उमेदवारी द्या असा
टोलाही श्री. तेली यांनी हाणला.

ते म्हणाले, केसरकर यांनी ते घोषणामंत्री कसे आहेत हे
सिद्ध केले आहे. ताज हॉटेलच्या शुभारंभाची त्यांनी
तिसऱ्यांदा घोषणा केली आहे. याबद्दल मुंबईत मंत्रालयात
कोणाला माहितीही नाही आहे. एमआयडीसीत एखादा
मंत्री उद्योजकाला घेऊन जातो हे दृश्य महाराष्ट्रात नवीन
आहे. यामागे गौडबंगाल काय आहे? असा सवाल माजी
आमदार राजन तेली यांनी केला. तसेच पंधरा वर्षात
दीपक केसरकर यांनी काय केलं ? ५० लोकांना रोजगार
देणारा एखादा प्रकल्प आणला का ? केवळ घोषणा
करण्याचे काम केसरकर यांनी केलं. हरीत क्षेत्रात लाल
श्रेणीत येणार का ? असा सवाल अभ्यासक करत आहेत.
त्यामुळे राजस्थानच्या कंपनीला जागा आणून दाखवत
काय साध्य करणार ? लोकांना रोजगार कसा देणार असा
सवाल त्यांनी केला. मल्टीस्पेशालिटी, अम्युझमेंट पार्कच भुमिपूजन करणार अशा घोषणा केसरकर यांनी केल्या आहेत. उद्योग येणार असं केसरकर दाखवत आहेत. सावंतवाडी
मतदारसंघाला भकास करण्याच काम त्यांनी केलं आहे.