ठळक घडामोडी

भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद

भाजप उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद


सावंतवाडी:

सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि सौ. नीलमताई राणे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी श्रद्धाराजे भोंसले यांच्यासोबत पालकमंत्री ना. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आणि भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले हेदेखील उपस्थित होते.
खा. नारायण राणे यांनी सौ. श्रद्धाराजे भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांच्याशी निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यांनी श्रद्धाराजे भोंसले यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे आशीर्वादही दिले. राणे कुटुंबाकडून मिळालेल्या या आशिर्वादाने सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराला बळ मिळाले आहे.