सावंतवाडी

श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणाची पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा व शिखर कलश स्थापना सोहळयानिमित्त तळवडे गावातील परबवाडी येथील ग्रामस्थांनी व महिलांनी दिंडी काढली होती.
हि दिंडी सर्व ग्रामस्थांचे महत्वाचे आकर्षण ठरले. यावेळी महिला सर्व ग्रामस्थ या दिंडीत सहभागी झाले होते. परबवाडी येथून ही दिंडी काढून तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर व त्यानंतर श्री देवी सातेरी मंदिरापर्यंत आली. तळवडे गावचे श्रीदेवी सातेरी देवीचा कलशारोहण सोहळा व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या दिमाखात चालू आहे या विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे .उद्या या सोहळ्याची समाप्ती होणार आहे. आज दुपारी कलशारोहणाचा महत्त्वाचा कार्यक्रम संपन्न होत आहे.









