सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा तिढा अजूनही कायम असून, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना युतीसाठी थेट प्रतिआव्हान दिले आहे. केसरकर यांनी भाजप-सेनेची युती व्हावी ही आपली इच्छा असल्याचे स्पष्ट करत, “भाजपने आपले १० उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे १० उमेदवार मागे घेतो आणि भाजपने आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा,” असा नवा प्रस्ताव ठेवला आहे.
युतीसाठी नवा प्रस्ताव:
केसरकर यांनी अनेकवेळा पालकमंत्री नितेश राणेंकडे युतीसाठी प्रयत्न केले होते, पण युती कोणामुळे झाली नाही, हे भाजपने पाहावे असे म्हटले.
“अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले १० उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे १० उमेदवार मागे घेतो.”
केसरकर म्हणाले की, “आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित आहे, तो सर्वसामान्य लोकांना भेटू शकतो .त्यामुळे, भाजपने आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.
राजघराण्यावरील टीकेवर खुलासा
राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही. पालकमंत्री नितेश राणेंना कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आहे. तो कोणीतरी व्हिडीओ व्हायरल केला आहे . आमच्या कोणत्याही व्यंक्तीचा त्यात सबंध नाही
कणकवली आघाडीला अधिकृत पाठिंबा नाही:केसरकर यांनी स्पष्ट केले की, कणकवलीतील ‘शहर विकास आघाडीआहे. “तुम्ही युती करत नाही आणि एकही जागा सोडत नाही, याला जबाबदार कोण? याचा विचार पालकमंत्री नितेश राणे यांनी करावा,” असे मत केसरकर यांनी व्यक्त केले.
खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केलेल्या युतीच्या प्रस्तावाला आपला पाठिंबा होता आणि यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनाही भेटल्याचे त्यांनी सांगितले.”अजूनही वेळ गेली नाही, पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकांना युतीने सामोरे जाऊया,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.







