ठळक घडामोडी

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

सावंतवाडी :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) या दोन्ही परीक्षेत तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यीनीनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रशालेच्या चार विद्यार्थीनींनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी वैभवी गोविंद परब हिने ८० टक्के गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती प्राप्त करून तालुक्यात दुसरी तर जिल्ह्यात सहावी आली. तसेच कुमारी समृद्धी चंद्रकांत राऊळ हिने ७१ टक्के गुण प्राप्त करत ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती मिळवून तालुक्यात दुसरी तर जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकाविला. तसेच कुमारी अनुष्का नारायण राऊळ ५८ टक्के गुण मिळवून सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त करत तालुक्यात तिसरी तर जिल्ह्यात १७ वा क्रमांक मिळविला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी स्वरा कृष्णा गवस ७१.३३ टक्के गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त करत तालुक्यात १५ वी तर जिल्ह्यात ६६ वी आली. या यशस्वी सर्व विद्यार्थीनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समितीचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारूती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सहाय्यक शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर, प्रज्ञा मातोंडकर, बाबाजी सावंत, शैलजा आसोलकर, वैभव दगडखैर, नेहा गोसावी, ऋतुजा सावंत-भोसले यांनी या यशस्वी विद्यार्थ्यीनीना मार्गदर्शन केले.