वेंगुर्ला
होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त सत्यनारायण महापूजा
श्रावण महिन्याच्या निमित्ताने होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी मंदिर येथे आज सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सुगम संगीत मैफिल होईल, ज्यामध्ये गायक कु. हेमंत गोडकर व कु. प्रशांत काजरेकर आपली कला सादर करतील. त्यांना हार्मोनियमवर श्री. गजानन मेस्त्री, तबल्यावर श्री. अक्षय सरवणकर आणि टाळ श्री. सागर सावळ साथ देतील.
रात्री ८ वाजता गावडेश्वर भजन मंडळ फणसखोल यांचे वारकरी भजन होणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता ग्रामस्थांची भजने होतील.
या विविध कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त मानकरी, देवसेवक व ग्रामस्थांनी केले आहे.








