होडावडे गावात श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू
होडावडे:

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर मंदिरामध्ये आजपासून दीड दिवसांच्या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ झाला.
या सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला आहे. सकाळच्या पूजेनंतर सप्ताहाला सुरुवात झाली. यात गावातील आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
सप्ताहा दरम्यान अखंड विविध भजनी मंडळे नामस्मरण आणि भजन करणार आहेत. यामुळे, संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.या हरिनाम सप्ताहाची सांगता उद्या होणार आहे.








