ठळक घडामोडी

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष!३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

तळवडे गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; मनिष दळवी सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष

३१ लाखांच्या रस्ते विकासकामांचा शुभारंभ

सावंतवाडी

तळवडे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

तळवडे गावातील ३१ लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या तीन महत्त्वाच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन दळवी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

तळवडे गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना प्रवासासाठी अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये खालील कामांचा समावेश आहे:भवानी मंदिर ते मांजरेकर वाडी रस्ता १४ लाख रुपये ,भाऊचा धक्का ते बादेवाडी रस्ता १० लाख रुपये ,भाऊचा धक्का ते लोकेवाडी रस्ता , ७ लाख रुपये निधी. मंजूर झाला आहे.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी श्रीफळ वाढवून या कामांची अधिकृत सुरुवात केली. या नवीन रस्त्यांमुळे गावांतर्गत दळणवळण अधिक सोपे होणार असून, दुर्गम वाड्या-वस्त्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या जाणार आहेत.

या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष परब, तळवडे शक्ति केंद्रप्रमुख शंकर सावंत, आंबोली मंडळ सरचिटणीस दादा परब, ग्रामपंचायत सदस्य जगदीश मांजरेकर, मंगलदास पेडणेकर नम्रता गावडे, विकास गावडे सुशांत गावडे, प्रवीण लोके, बाळू साळगावकर, रामा गावडे, दाजी तुळसकर, सुदन मांजरेकर, मयुरी राऊळ पोलीस पाटील, झिला वेंगुर्लेकर, विनय काणेकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांच्या शुभारंभामुळे तळवडे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.