माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार
भारतीय सैन्य दलात दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान
सावंतवाडी :
मळगाव तेलकाटावाडी येथील रहिवासी माजी सैनिक शंभा मंगेश सावंत हे भारतीय सैन्य दलातून हवालदार पदावरून निवृत्त झाल्याने सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शंभा सावंत हे २९ जुन २०१० रोजी भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. १५ वर्षे २ महिन्यांच्या सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी हवालदार पदावरून दिल्ली येथून ते निवृत्त झाले. त्यांनी देशासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंभा सावंत यांच्या मातोश्री मंगला सावंत, पत्नी पूजा सावंत, गंगाराम राऊळ, अंकुश शेटकर, गजानन लातये, संतोष राऊळ, श्रीकृष्ण लातये, निलेश ठाकूर, सहदेव राऊळ, उदय राऊळ, प्रशांत राऊळ, प्रकाश गावडे, संतोष ठाकूर, संतोष गावडे आदी सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी मंडळातर्फे केलेल्या सत्काराबद्दल मंडळाचे आभार व्यक्त करत तेलकाटावाडीतील ग्रामस्थांमध्ये असलेल्या एकजुटीबद्दल सर्वांचे कौतुक केले.







