ठळक घडामोडी

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात जोरदार प्रचार मोहीम सुरु!मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचां आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना गाडण्याची वेळ आलीय’ – मळगावात आमदार महेश सावंतांचा विरोधकांवर हल्लाबोल

मळगावात ठाकरे शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचा माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते शुभारं

​मळगाव

“शिवसेनेने या निवडणुकीत निस्वार्थी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पैशाच्या जोरावर उडणाऱ्यांना या निवडणुकीत गाडण्याची वेळ आता आली आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ‘मशाल’ पेटली पाहिजे,” असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी केले.
​मळगाव पंचायत समिती मतदारसंघातील ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार पांडुरंग राऊळ यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज (१ फेब्रुवारी) आमदार महेश सावंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
​पांडुरंग राऊळ यांच्यासारखे निस्वार्थी लोक क्रांती घडवतील
​उमेदवार पांडुरंग राऊळ यांचे कौतुक करताना आमदार सावंत पुढे म्हणाले की, “पांडुरंग राऊळ हे अत्यंत निस्वार्थी व्यक्तिमत्व आहेत. अशाच व्यक्ती समाजात क्रांती घडवू शकतात. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन विधानसभेप्रमाणेच पंचायत समितीवरही भगवा फडकवावा,” असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
​कार्यक्रमाला शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
​या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर आणि परिसरात शिवसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी पांडुरंग राऊळ (उमेदवार, पंचायत समिती), ​गुरुनाथ गावकर, ​संजय धुरी (मळगाव शाखाप्रमुख), ​नितेश तेली,​ राजेश राऊळ ​या कार्यक्रमाला मळगावमधील ग्रामस्थ, महिला वर्ग आणि ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.