नंदकिशोर गावडे-बंड यांच्या दीर्घ सेवेमुळे गावाचा आणि जिल्ह्याचा वाढला मान…
आंबोली, ता- ३०:
सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र नंदकिशोर लक्ष्मण गावडे- बंड यांनी भारतीय सैन्यात तब्बल १७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आज (३० सप्टेंबर २०२५) रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे.
गावडे यांनी आपल्या दीर्घ सेवेतून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोलाचा वाटा उचलला आहे.
त्यांच्या या निस्वार्थ आणि समर्पित सेवेमुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण आंबोली गाव आणि जिल्ह्याला त्यांचा मोठा अभिमान आहे.
नंदकिशोर गावडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थ याच्या मार्फत भव्य सत्कार करण्यात येणार आहे. संदीप नाटलेकर, अनिल नाटलेकर, सुरेश गावडे, गणपत गावडे यांसह समस्त ग्रामस्थांकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.








