ठळक घडामोडी

पोस्ट ऑफिस वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे

वेंगुर्ला : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने पोस्ट ऑफिस, वेंगुर्ला येथील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे. समाजातील विविध क्षेत्रांत सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवांप्रती आपुलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांना राखी बांधली व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, आय.एस.ओ. गौरी मराठे, ई.सी. मेंबर डॉ. पूजा कर्पे, मेंबर रसिका मटकर, वैभवी दाभोलकर, तसेच पोस्ट मास्टर सौ. वाडेकर मॅडम व पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

या उपक्रमातून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी बांधवांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून सदस्यांचे आभार मानले.