ठळक घडामोडी

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना – पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडी (सिंधुदुर्ग)

: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला गुळनिर्मिती उद्योगामुळे चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी केले. नाधवडे, वैभववाडी येथे ‘अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड’ या स्थानिक तरुणांनी सुरू केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन व लोगो अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक तरुणांचे कौतुक

  • अभिमानास्पद बाब: स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा गुळ निर्मिती उद्योग अभिमानास्पद आहे.
  • संपूर्ण सहकार्य: अशा प्रकल्पांना माझे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री राणे यांनी दिली.
  • स्थलांतर थांबवण्यासाठी उद्योगांची गरज: जिल्ह्यातून तरुण पिढीचे होणारे स्थलांतर थांबवायचे असेल, तर जिल्ह्यात उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक आहे.
  • तरुणांना आवाहन: त्यासाठी स्थानिक तरुणांनी उद्योगाच्या माध्यमातून पुढं यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    प्रमुख उपस्थिती
    या कार्यक्रमास जिल्हा बँक संचालक श्री. दिलीप रावराणे, पणन महासंघाचे संचालक श्री. प्रमोद रावराणे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.