
तळवडे : गतवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावणी सोमवारनिमित्त तळवडे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तळवडे व्यापारी संघटना, देवस्थान कमिटी तळवडे व गावकर मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
यावेळी ११ सत्यनारायण पूजा बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व व्यापारी बंधू-भगिनी तसेच ग्रामस्थांनी मंदिरात उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम होणार असून दुपारी २ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी भाविकांनी महाप्रसाद व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच कार्यक्रमासाठी सर्व व्यापारी बंधू-भगिनींचे सहकार्य लाभावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तळवडे व्यापारी संघटना यामार्फत करण्यात आले आहे.







