ठळक घडामोडी

सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: माजी मंत्री तथा “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव”

सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव”

सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट: “आमदार केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कुटील डाव”
सावंतवाडी: आमदार दीपक केसरकर यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा काही व्यक्तींचा कुटील डाव आहे, असा सनसनाटी गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी येथे केला. मात्र, असा प्रयत्न करणाऱ्यांना सावंतवाडीकरांनी योग्य जागा दाखवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.सावंतवाडीतील शिल्पग्राम येथे आयोजित केलेल्या एका महत्त्वपूर्ण सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, संपर्क नेते श्री. राजेश मोरे, जिल्हाप्रमुख संजू परब, तसेच शिवसेनेचे सर्व, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार नीता सावंत – कविटकर, नगरसेवक, पदाचे उमेदवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सभेला सावंतवाडी शहरातील डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, व्यावसायिक तसेच विविध स्तरातील बुद्धिजीवी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बुद्धिजीवी वर्गाच्या उपस्थितीत बोलताना मंत्री सामंत यांनी हे खळबळजनक विधान केले.
मंत्री सामंत यांच्या या विधानामुळे सावंतवाडीच्या स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.