तळवडे, ता. सावंतवाडी : पंचक्रोशीतील शैक्षणिक विकासाला सातत्याने चालना देणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेच्या नवीन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी काकासाहेब पेडणेकर तसेच माजी अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब बुगडे यांच्या शैक्षणिक विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या कार्यकारणीवर सोपविण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी श्री. श्रीकृष्ण शंकर पेडणेकर, उपाध्यक्षपदी डॉ. भालचंद्र अनंत कांडरकर, तर सचिवपदी श्री. न्हानू ऊर्फ दादा विष्णू पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच सहसचिवपदी श्री. भूषण लवू पेडणेकर, खजिनदारपदी श्री. सुरेश जगन्नाथ गावडे आणि अंतर्गत हिशोब तपासणीसपदी श्री. संतोष विठ्ठल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी सदस्य
कार्यकारणी सदस्य म्हणून श्री. विजय कृष्णाजी बुगडे, श्री. उमाकांत काशिनाथ भगत, श्री. विजय बापूजी फेंद्रे, श्री. बाबुराव दत्ताराम गोडकर, श्री. देवेश शिवराम कावळे आणि श्री. शंकर संभाजी साळगावकर यांची निवड करण्यात आली.
स्वीकृत सदस्य
स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. भरत मधुकर बुगडे, श्री. वसंत रघुनाथ कांडरकर आणि श्री. हरिश्चंद्र गंगाराम काजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सल्लागारपदी अनुभवी मान्यवर
संस्थेच्या सल्लागारपदी प्रा. दिलीप दत्ताराम गोडकर, श्री. सच्चिदानंद मधुकर बुगडे, श्री. शशिकांत मधुकर रेडकर आणि श्री. विठोबा मोहन पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना अधिक व्यापक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या शाळा व महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आणि पंचक्रोशीतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम करणे, यासाठी नवीन कार्यकारणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांसह सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, स्वीकृत सदस्य व सल्लागारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








