ठळक घडामोडी

आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उदया रक्तदान शिबिर, केक कापून वाढदिवस व वृक्षवाटपाचा कार्यक्रम

सावंतवाडी, प्रतिनिधी :

सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

त्यानंतर सकाळी ११ वाजता आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना वृक्षवाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली आहे.