१३ जूनला मतमोजणी; जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू
सिंधुदुर्ग
विधानपरिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० जूनला होणार आहे. तर मतमोजणी १३ तारखेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १८ जून पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.







