सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उदया १०नोव्हेंबर रोजी
सावंतवाडी,
ता. ०९ : तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, १० नोव्हेंबरला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या निमित्ताने सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाऱ्हाणे घालणे, नवस फेडणे, ओटी भरणे आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
रात्री १०.३० वाजता पालखी प्रदक्षिणा व दिपोत्सव होणार असून, त्यानंतर उशिरा नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळींनी केले आहे.







