ठळक घडामोडी

मत्स्य व बदंरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात स्वागत

मत्स्य व बदंरे विकास मंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधवांकडून उत्साहात स्वागत


वेंगुर्ले:

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बदंरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांचे वेंगुर्ले मठ सिध्दार्थ नगर येथे बौद्ध बांधव आणि महिला भगिनी यांच्या वतीने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.
सिध्दार्थ नगर येथील बौद्ध बांधवांनी आणि महिला भगिनींनी एकत्र येत, मंत्री महोदयांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.
या प्रसंगी माजी जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव, उपसरपंच सोनिया मठकर, तसेच उमेश मठकर, स्वप्नील मठकर, दामू मठकर, बंटी मठकर, मंदार मठकर आदींसह सिध्दार्थ नगर येथील बौद्ध बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री महोदयांचे आगमन परिसरासाठी एक महत्त्वपूर्ण घटना ठरली असून, बौद्ध बांधवांनी केलेल्या या भव्य स्वागतामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.