ठळक घडामोडी

आरपीडी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज

आरपीडी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा होणार सन्मान; शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचा उपक्रम

सावंतवाडी : प्रतिनिधी

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा सोहळा सावंतवाडी येथील नवरंग कलामंच येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमात चौथी शिष्यवृत्ती परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा, सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा तसेच ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या वतीने आयोजित या गुणगौरव सोहळ्याला पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


📢 आपल्या व्यवसायाची जाहिरात करा, बातमी प्रसिद्ध करा!

आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी व बातमी देण्यासाठी आजच संपर्क साधा.

📞 संपर्क क्रमांक : 9763717761

महासिंधु किरण न्यूज
सत्य • बेगवान • जनहिताचा आवाज…