ठळक घडामोडी

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा

तळवडे सिद्धेश्वर मंदिरात १८ रोजी गुरुवंदना सोहळा

न्हावेली / वार्ताहर


श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित रविवार १८ ॲागस्ट रोजी श्री देव सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वाजता देवता पूजन, सकाळी ९.३० वाजता दिपप्रज्वलन,उद्धाटन व मान्यवरांचे स्वागत सकाळी १० वाजता ३५ ते ४० विद्यार्थ्यांचा एकसंघ मृदुंगनाद,सकाळी ११ वाजता संगीत जुगलबंदी ( बुवा – रुपेंद्र परब बुवा – अमित तांबोळकर ) यांना संवादिनी गजानन मेस्री पखवाज मेहल कांडरकर व तबला बंड्या धारगळकर तसेच निवेदक आडेलकर सर यांना करणार आहेत.